उस्मानाबाद - सर्व धर्मात विवाह संस्काराला महत्त्व देण्यात आले आहे. प्रत्येक धर्मातील विवाह करण्याची पद्धत वेगळी असली, तरी त्यात प्रमुख आकर्षण असते ते बँड पथकाचे. या बँड पथकात सनई, चौघडा, ढोल, ताशा यांसह नवनवीन वाद्य वाजवण्यात येतात. त्याचबरोबर विवाहप्रसंगी डॉल्बी या वाद्यावर देखील तरुणाई आवर्जून ठेका धरते. मात्र, कोरोनामुळे या सर्वच घटकावर मोठी अवकळा आली आहे. ही सर्व वाद्ये आता धूळखात बसली आहे. तर डॉल्बीच्या गाड्या प्लास्टिकने झाकून ठेवण्यात आल्या आहेत.
कोरोना लॉकडाऊनमुळे बँड पथकांसमोर आर्थिक पेच; कुटुंबियांवर उपासमारीची वेळ हेही वाचा...न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
उस्मानाबाद शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वडगाव (सिद्धेश्वर) या गावामध्ये 3 बँड पथके आहेत. याच गावातील चंद्रकांत कसबे यांनी 2005 साली या व्यवसायाला सुरुवात केली. प्रथम छोटा आणि जुन्या पद्धतीचा बँड घेतला. या पथकात 11 लोकांना रोजगाराची संधी मिळाली. इतर व्यवसायिकांप्रमाणेच आपलाही व्यवसाय वाढवण्यासाठी चंद्रकांत कसबे यांनी साडेपाच लाख रुपये खर्च करून डॉल्बीची खरेदी केली. मात्र, कोरोनामुळे आजपर्यंत एक रुपयाची देखील सुपारी (लग्नाचे काम) त्यांच्या या डॉल्बीला मिळालेले नाही. त्यात जिल्ह्यात दुष्काळ पडला, गारपीट झाली. त्यामुळे कधी नव्हे इतका मोठा आर्थिक फटका बसला असल्याचे चंद्रकांत कसबे सांगतात.
हेही वाचा...कोरोनाचा राज्याला विळखा होतो घट्ट; 'आकडा' ऐकून काळजात भरेल धडकी
वडगावमध्ये आज घडीला तीन डॉल्बी पथक आणि जुन्या पद्धतीचे तीन बँडपथक आहेत. या प्रत्येक पथकामध्ये अकरा लोकांना रोजगाराची संधी मिळते. जवळपास या लग्नसराईमध्ये 66 लोकांची रोजीरोटी याच व्यवसायावर अवलंबुन होती. मात्र, कोरोनामुळे हा रोजगार काही उपलब्ध झाला नाही. उलट आता या बँड पथकाच्या मालकांना लग्नात बँड वाजवण्यासाठी घेण्यात आलेली आगाऊ रक्कम परत करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे एकूणच कोरोना आणि लॉकडाऊन याचा फटका मोठ्या उद्योगांना बसलाय, तसाच या लहान व्यवसायिकांना देखील बसला आहे.