महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, काँग्रेस शिष्टमंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन - survey of agricultural loss news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अतिवृष्टीग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात तुळजापूर काँग्रेस शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.

काँग्रेस शिष्टमंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
काँग्रेस शिष्टमंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By

Published : Oct 21, 2020, 7:24 PM IST

उस्मानाबाद - मराठवाड्यासह राज्यातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे सुगीच्या काळात शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेले सोयाबीन पाण्यामध्ये आहे. ऊस, बाजरी, मका, कापूस, तूर, सूर्यफुल, कांदा, तसेच फळ बागांचे मोठे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन केली आहे.

काँग्रेस शिष्टमंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (बुधवार) अतिवृष्टीग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात तुळजापूर काँग्रेस शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत देण्यात यावी. अतिवृष्टीने मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, फळबागांसाठी वेगळे पॅकेज देण्यात यावे. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्यात यावे. अतिवृष्टिमुळे पडझड झालेल्या घरांचे पुनर्वसन करण्यात यावे. पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्यात यावे, या मागण्या काँग्रेस नेत्यांनी केल्या आहेत.

या शिष्टमंडळात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, आमदार अमर राजुरकर, आमदार धीरज देशमुख, उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अशफाक बळ्ळोलगी, उस्मानाबाद जिल्हा बँकेचे संचालक सुनील चव्हाण, उस्मानाबाद शहर काँग्रेसचे अध्यक्ष अग्निवेश शिंदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा -खडसेंचा प्रवेश ठरला, शुक्रवारी दोन वाजता राष्ट्रवादीत होणार प्रवेश

ABOUT THE AUTHOR

...view details