उस्मानाबाद- भारत बंदला उस्मानाबादमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. चालू आठवड्यातील कालचा (दि. 29 जानेवारी) दुसरा बंद होता. वंचित बहुजन आघाडी आघाडीने पुकारलेल्या बंदनंतर अवघ्या पाच दिवसातच हा दुसरा बंद होता. त्यामुळे म्हणावा तसा प्रतिसाद या बंदला मिळाला नाही.
उस्मानाबाद शहर वगळता लोहारा, तुळजापूर, उमरगा, परंडा, भूम, कळंब, वाशी या सातही तालुक्यातील बाजारपेठ सुरू होती. सतत विविध कारणाने बंद पुकारला जात असल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ग्रामस्थांची, रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे सांगत उमरगा बाजारपेठ बंद न ठेवण्याचा निर्णय येथील व्यापारी महासंघाने घेतला होता. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते.