महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 1, 2019, 10:19 PM IST

ETV Bharat / state

'मुख्यमंत्री स्वतःचे गुन्हे लपवतात आणि आमची बदनामी करतात'

पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री आणि गृहखाते सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्हे लपविले आहे. आमची बदनामी केल्यानंतर भाजप-सेनेची सत्ता टिकेल,असा त्यांचा समज आहे, अशी टिका शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

शरद पवार

उस्मानाबाद- पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री आणि गृहखाते सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्हे लपविले. याबाबात कोणीतरी याचिका दाखल केली. याबाबात सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. राज्य सहकारी शिखर बँकेत सर्वपक्षाच्या लोकांनी चालविली. पण, नाव केवळ आमचेच चर्चेत ठेवले आहे.

बोलताना शरद पवार
आज (मंगळवार) शरद पवार उस्मानाबद जिल्ह्यातील भूम येथे राहूल मोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मात्र, हा अर्ज दाखल करण्यात आला नाही. यावेळी आयोजित सभेमध्ये शरद पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, आमची बदनामी केल्याशिवाय भाजप-सेनेचे राज्य टिकणार नाही. त्यामुळे आमच्यावर गुन्हा दाखल करण्याच षड्यंत्र असून मी शिखर बँकेचा सभासद नाही, संचालक नाही, तरीही माझ्यावर गुन्हा दाखल करुन राज्यात सत्तेत येण्याच काम सेना-भाजप करत आहे. त्यासाठी सर्वांनी सावध राहून अघाडीच्या पाठीशी राहावे असे, आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details