उस्मानाबाद - भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या परवानगीनंतर उस्मानाबादमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कोरोना टेस्टिंग लॅबचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमादरम्यान सोशल डिस्टन्सला हरताळ फासणाऱ्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी झापले, तर असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी समज दिली.
उस्मानाबदमध्ये कोरोना रुग्णांचा वाढता आलेख पाहता कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचे ऑनलाइन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला ऑनलाइन पद्धतीनेच आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री शंकर गडाख यांची देखील हजेरी होती. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचारी, खासदार आणि आमदारांची उपस्थिती होती. मात्र, कार्यक्रमादरम्यान सोशल डिस्टन्सचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे पाहायला मिळाले.