उस्मानाबाद - कळंब शहरात शनिवारी रात्रीच्या सुमारास पारधी समाजातील दोन गटात तुफान हाणामारी झाली. हाणामारीचे कारण अद्यापही स्पष्ट नसले तरी किरकोळ कारणावरून या दोन गटात हाणामारी झाल्याचे बोलले जात आहे. यामध्ये गावठी पिस्तुलाचाही वापर करण्यात आला आहे. गोळीबार करत तलवार, काठ्या आणि दगडांचादेखील वापर करण्यात आला आहे.
कळंब शहरात तलवार-काठ्यांनी तुफान राडा, गोळीबारात २ जखमी - उस्मानाबाद
हाणामारीचे कारण अद्यापही स्पष्ट नसले तरी किरकोळ कारणावरून या दोन गटात हाणामारी झाल्याचे बोलले जात आहे.
![कळंब शहरात तलवार-काठ्यांनी तुफान राडा, गोळीबारात २ जखमी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3769769-thumbnail-3x2-dfs.jpg)
कळंब शहर
कळंब शहरात हाणामारी
येथे झालेल्या गोळीबारात २ जण गंभीर जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या जवळ ही घटना घडली असून या प्रकारामुळे शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.