उस्मानाबाद-विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता निकालाची उत्सुकता लागली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ असून उस्मानाबाद, तुळजापूर, भूम, आणि उमरगा येथे मतमोजणी होणार आहे. उस्मानाबाद येथील शासकीय आयटीआय येथे मत मोजणी होईल. तुळजापूर येथे अभियांत्रिकी विद्यालय स्पोर्ट्स हॉलमध्ये मतमोजणी होणार, उमरगा या मतदारसंघाची मतमोजणी पंचायत समिती सभागृहात होणार आहे. तर परंडा मतदारसंघाची मतमोजणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे होणार आहे.
उस्मानाबादमध्ये मतदानानंतर निकालाची उत्कंठा शिगेला - Osmanabad Assembly Election Result awaits
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर निकालाची उत्सुकता लागली आहे. उस्मानाबादच्या चार विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रीयेसाठी ५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
![उस्मानाबादमध्ये मतदानानंतर निकालाची उत्कंठा शिगेला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4844094-844-4844094-1571828027783.jpg)
उस्मानाबादमध्ये निकालची उत्कंठा शिगेला
उस्मानाबादमध्ये निकालची उत्कंठा शिगेला
मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून उस्मानाबाद येथे 30 फेऱ्यात तुळजापूर येथे 29 फेऱ्या उमरगा येथे 23 फेऱ्या व परंडामतदारसंघात 27 फेऱ्यात मतमोजणी पूर्ण होणार आहेत. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर ती जवळपास 250 पोलिस कर्मचारी, अधिकारी असणार आहेत. मतमोजणीसाठी विविध शासकीय कार्यालयातील 500 कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेली आहेत. लोकांना दोन दिवसापूर्वी केलेल्या मतदानानंतरच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे .