उस्मानाबाद- मराठवाड्यातील दुष्काळ कायमस्वरूपी हटवायचे असेल तर 21 टीएमसी पाणी येणे गरजेचे आहे. या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. संभाजीराजे यांनी मराठवाड्याच्या दुष्काळ दौऱ्याला मंगळवारपासून सुरुवात केली.
दुष्काळ हटवण्यासाठी उस्मानाबादला हक्काचे 21 टीएमसी पाणी द्या- खासदार संभाजीराजे - DROUGHT
शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार न करता तसेच खचून न जाता या संकटाचा सामना करावा, आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. तसेच त्यांनी तुळजापूर येथील रामदरा येथील 21 टीएमसी प्रकल्प सध्यास्थिती आढावा घेतला. त्याचबरोबर चारा छावणीस भेट देऊन तुळजाभवानी मातेचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
संभाजीराजे यांनी आज जिल्ह्यातील मेडसिंगा या गावातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करून राज्याभिषेक सोहळ्याचे मानकरी असलेल्या कुटुंबाला भेट दिली. याच कुटुंबातील एका तरुण शेतकऱ्यांनी 2016 मध्ये नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करत असून उस्मानाबादसाठीही वेगवेगळ्या योजना राबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे संभाजीराजे यांनी 'ईटीव्ही भारत' सोबत बोलताना सांगितले.
शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार न करता तसेच खचून न जाता या संकटाचा सामना करावा, आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. तसेच त्यांनी तुळजापूर येथील रामदरा येथील 21 टीएमसी प्रकल्प सध्यास्थिती आढावा घेतला. त्याचबरोबर चारा छावणीस भेट देऊन तुळजाभवानी मातेचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर मेडसिंगा येथील गावाला भेट देत राज्याभिषेक सोहळ्याचे मानकरी असलेल्या कुटुंबाच्या शेतामध्ये कुळव धरला आणि याच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी जेवणदेखील केले.