उस्मानाबाद - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 390 वी जयंती उत्साहात साजरी होत आहे. शिवजयंतीनिमित्त वेगवेगळे उपक्रमही राबवले जातात. असाच एक उपक्रम जिल्ह्यातील वाशी येथे राबविण्यात आला आहे. कळंब तालुक्यातील शिराढोण येथील कलाकाराने रोपांपासून शिवप्रतिमा साकारली आहे. तब्बल 9000 रोपांपासून या शिवभक्ताने शिवरायांची प्रतिमा साकारली आहे.
उस्मानाबादेत रोपांपासून साकारली 'शिवप्रतिमा' - chhatrapti shivaji maharaj painting osmanabad
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 390 वी जयंती उत्साहात साजरी होत आहे. कळंब तालुक्यातील शिराढोण येथील कलाकाराने रोपांपासून शिवप्रतिमा साकारली आहे. तब्बल 9000 रोपांपासून या शिवभक्ताने शिवरायांची प्रतिमा साकारली आहे.
हेही वाचा -हा विषय गंभीर..! बोलताना चुका होतातच, इंदोरीकर महाराजांचा उद्देशही पाहावा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवरायांची रोपांपासून प्रतिमा तयार केली आहे. ही प्रतिमा साकारण्यासाठी 18 प्रकारची विविध रोपे वापरण्यात आली आहेत. राजकुमार कुंभार असे ही प्रतिमा तयार करणाऱ्या कलाकाराचे नाव आहे. या कलाकाराच्या मते हा एक विश्वविक्रमी प्रयोग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव साजरा करण्यासाठी उस्मानाबादकर सज्ज झाले आहेत. ही प्रतिमा पाहण्यासाठी परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत.