उस्मानाबाद - अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय एनडीआरफचे पथक उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर होते. मुख्य अभियंता तुषार व्यास यांनी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांनी मांडल्या आपल्या व्यथा
तालुक्यातील केशेगाव शिवारातील नुकसानग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी आलेल्या पथकासमोर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी शेतकऱ्यांनी शेतीचे झालेले नुकसान, सरकारकडून मिळणारी मदत आणि शेतीमध्ये केलेल्या खर्चाचे गणित पथकासमोर मांडले.
आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नका! केंद्रीय पथकाचा शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न... पथकाचा शेतकऱ्यांना धीर
आम्ही तुमच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहचवू. तुम्हाला मदत मिळेल मात्र, तुम्ही आत्महत्या करु नका अशा शब्दात पथकाने शेतऱ्यांना धीर दिला. मागील दोन महिन्यापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मूग, तूर, कापूस, पपई, ऊस, फळबागा यासह शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक उस्मानाबाद दौऱ्यावर आले होते.
हेही वाचा-कोरोनाच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी ३४ जणांवर गुन्हा दाखल; मोठ्या सेलिब्रिटींचा समावेश
हेही वाचा-वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप