उस्मानाबाद - बोगस बियाणे विक्री करणाऱ्या 2 कंपन्याविरुध्द उस्मानाबाद शहर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अकोला येथील वसंत अॅग्रो इ. लि. आणि जालना येथील कृषीधन सीड्स प्रा. लिमिटेड मुख्य कार्यालय पुणे या दोन कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारले होते. त्याचबरोबर संबंधित कंपन्यांनी शेतकऱ्यांना बियाणे किंवा भरपाई देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे कृषी विभागाने या कंपन्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोगस सोयाबीन बियाणांची विक्री करणाऱ्या 2 कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल... - बोगस सोयाबीन न्यूज
बोगस बियाणे विक्री करणाऱ्या 2 कंपन्याविरुध्द उस्मानाबाद शहर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अकोला येथील वसंत अॅग्रो इ. लि. आणि जालना येथील कृषीधन सीड्स प्रा. लिमिटेड मुख्य कार्यालय पुणे या दोन कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारले होते.
खरिपाच्या सुरूवातीला चांगला पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करुन पेरण्या केल्या. जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी सोयाबीनची करण्यात आली. मात्र, या पेरलेल्या बियाणांपैकी केवळ ३० ते ४० टक्केच सोयाबीन उगवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या. त्यानंतर या शेतकऱ्यांना बियाणांच्या कृषी विभागाकडे तक्रारी केल्या. त्याच अनुषंगाने कृषी विभागाच्या पथकांद्वारे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तपासणी केली. त्यानंतर वरील कंपन्यांनी शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बियाणे निरीक्षक बी.आर. राऊत व डी.आर.जाधव यांनी या कंपन्याविरुध्द फिर्याद दिली. यावरुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.