उस्मानाबाद - ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे. संत गोरोबाकाका साहित्य नगरीमध्ये संमेलनाला सुरुवात झाली असून ढोल-ताशा गजर आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करून आलेले विद्यार्थी साहित्य रसिकांचे लक्ष केंद्रीत करीत आहेत. शहरातील तुळजाभवानी मैदानापासून या ग्रंथदिंडीला सुरुवात होणार आहे.
साहित्याची जत्रा : ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरुवात, हजारो विद्यार्थी एकवटले तुळजाभवानी मैदानात - ग्रंथदिंडी
संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. चौका-चौकात ग्रंथदिंडीचे स्वागत करण्यासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ग्रंथदिंडीला खांदा देण्यात येणार आहे.
ग्रंथदिंडी
दरम्यान, जिल्हाभरातील जवळपास दोन हजारहून अधिक विद्यार्थी या ठिकाणी दाखल झाले आहेत.