उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांवर भाजपने फुटीर शिवसेनेच्या मदतीने कब्जा करत पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उपविभागीय दंडाधिकारी रोडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज विषय समित्यांच्या निवड प्रक्रियेस सुरुवात झाली.
उस्मानाबाद: जिल्हा परिषदेतील विषय समित्यांवर 'भाजपचा'च कब्जा - osmanabad zp
भाजपयुक्त राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचे उमेदवारांचा 31 विरुद्ध 23 मतांनी पराभव केला. तत्पूर्वी सभापती पदासाठी अनेक सदस्यांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, सभापती पद न मिळाल्याने अनेक सदस्यांचा हिरमोड झाला आहे.
भाजपयुक्त राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचे उमेदवारांचा 31 विरुद्ध 23 मतांनी पराभव केला. तत्पूर्वी सभापती पदासाठी अनेक सदस्यांनी इच्छा व्यक्त केली होती. जिल्हा परिषद आवारात कार्यकर्ते जमवले होते. मात्र, सभापती पद न मिळाल्याने अनेक सदस्यांचा हिरमोड झाला. महाविकास आघाडीकडून टक्कर देण्यासाठी कोणत्याच मोठ्या नेत्याने विशेष प्रयत्न केल्याने विषय समित्यावरही भाजपचा दबदबा राहिला. महाविकास आघाडीकडून प्रकाश चव्हाण, पल्लवी खताळ, ज्ञानेश्वर गीते, महेंद्र धुरगुडे यांनी नामनिर्देशन दाखल केले होते. त्यांचा दिग्विजय शिंदे, रत्नमाला टेकाळे, दत्तात्रय देवळकर, दत्तात्रय साळुंके यांनी पराभव केला.
हेही वाचा -मनसेच्या महाअधिवेशनाचे पोस्टर लाँच... 'या' तारखेला धडाडणार राज ठाकरेंची तोफ