उस्मानाबाद - भाजपात होणारे इन्कमिंग याला कंटाळून भाजपात असलेले जुने नेत्यांचे आउटगोईंग सुरू झाल्याचे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल होत आहेत. मात्र पक्ष सोडून दुसरीकडे पर्याय शोधण्यासाठी देखील काही नेत्याची धावपळ सुरु आहे.
आता भाजपमध्येही सुरु होत आहे आउटगोईंग..! - सेना आणि भाजपा या दोन्ही पक्षातील नेत्यांची डोकेदुखी
भाजपात एकीकडे मोठ्या प्रमाणात भर्ती सुरु आहे. तर दुसरीकडे आपल्याया उमेदवारी मिळनार नाही. या चिंतेत असलेल्या नेत्यांची भाजपला सोडचिठ्ठी सुरु असल्याचे पाहण्यात येत आहे.
त्याचबरोबर उस्मानाबाद चे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील हे भाजपामध्ये येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे भाजपात असलेल्या जुन्या नेतांना अस्वस्थ वाटू लागले आहे. यातूनच आज एस.पी. शुगरचे चेअरमन सुरेश पाटील यांनी मात्र अपरिहार्य कारणामुळे भाजपाचा राजीनामा देत आहे. असे पत्रकार परिषदेत सांगितले. आणि त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणुक लढवणार असल्याचे देखील स्पष्ट केले. भाजपा आणि शिवसेनेमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची गर्दी प्रचंड आहे. मात्र, विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा भाजप प्रवेश झाला. तर मात्र या इच्छुक उमेदवारांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद मतदारसंघ हा शिवसेनेसाठी असला तरीही पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे या सेना आणि भाजपा या दोन्ही पक्षातील नेत्यांची डोकेदुखी वाढली असल्याचे बोलले जात आहे.