महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राणाजगजित सिंहांनी सहपरिवार बजाबला मतदानाचा हक्क - maharashtra assembly elections osmanabad 2019

संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. यात जनता मतदानाचा हक्क बजावत आहे. भाजपचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांचे वडील माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि परिवारसह मतदानाचा हक्क बजावला. तर परतीच्या पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्यात मतदान पार पडत आहे.

राणाजगजित सिंहांनी सहपरिवार बजाबला मतदानाचा हक्क

By

Published : Oct 21, 2019, 12:45 PM IST

उस्मानाबाद - संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. यात जनता मतदानाचा हक्क बजावत आहे. भाजपचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांचे वडील माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील आणि परिवारसह मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. तर परतीच्या पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्यात मतदान पार पडत आहे.

राणाजगजित सिंहांनी सहपरिवार बजाबला मतदानाचा हक्क

हेही वाचा -दिवस मतसंग्रामाचा : विखे-थोरात कुटुंबीयानी बजावला मतदानाचा हक्क

राणा पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. हक्काचा मतदारसंघ सोडून त्यांनी उस्मानाबाद तालुक्यातील 72 गावे हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात जोडले आहेत. या 72 गावांच्या भरवशावर तुळजापूर मतदार संघातुन भाजपच्या तिकिटावर राणाजगजितसिंह हे निवडणूक लढवत आहेत. तुळजापूर मतदारसंघात राणा जगजितसिंह यांच्यासमोर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांचे आव्हान आहे. मधुकरराव चव्हाण सातत्याने तुळजापूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. या चुरशीच्या लढतीत कोणाचे पारडे जड ठरणार हे येत्या 24 तारखेलाच स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा -सोलापुरातील मतदान केंद्रात मतदारांऐवजी वरुणराजाच बरसला

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.

हेही वाचा -दिवस मतसंग्रामाचा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे सहकुटुंब मतदान

या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details