उस्मानाबाद - शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली फक्त भ्रष्टाचार होत राहिला, असा आरोप भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केला. पवारांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत महाराष्ट्राला काय दिले? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ तुळजापूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
शरद पवारांनी महाराष्ट्राला काय दिले? - अमित शाह - भाजप अध्यक्ष अमित शाह
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी महाराष्ट्रभर सभांचा धडाका सुरू केला. महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ तुळजापूर येथे सभा घेण्यात आली. यावेळी त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी महाराष्ट्रभर सभांचा धडाका सुरू केला. ते म्हणाले, भाजप सत्तेत आल्यानंतर तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राचा विकास झाला. तसेच, तुळजापूरमध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आराद्यदैवत असलेल्या या तुळजापूरला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. यावेळी दत्ता कुलकर्णी ठाकूर, मिलिंद पाटील, नितीन काळे, उमेदवार रणजितसिंह पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
सभा सुरू होण्यापूर्वी पाऊस -
अमित शाह यांची सभा सुरू होण्यापूर्वी तुळजापूर शहरात पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी सभामंडपाबाहेर मोठी गर्दी होती. अचानक आलेल्या पावसामुळे कार्यकर्त्यांना डोक्यावर खुर्च्या घेऊन आसरा घ्यावा लागला. जवळपास 25 ते 30 हजार भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे आणि वाढलेल्या गर्दीमुळे कार्यकर्त्यांची थोडी तारांबळ उडाली.