उस्मानाबाद -शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर प्रचारादरम्यान चाकू हल्ला करण्यात आला. यात राजेनिंबाळकर किरकोळ जखमी झाले. शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी येथे गेल्यानंतर ही घटना घडली अजिंक्य टेकाळे नावाच्या गावातीलच तरुणाने हा हल्ला केला असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात खासदारांच्या हाताला मार लागला असून याबाबत शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्याच्या कारण मलाही माहित नाही. पोलिसांनी या आरोपीला पकडून खरा सूत्रधार कोण आहे, हे शोधावे अशी विनंती ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली.
पाटील-राजेनिंबाळकर वाद का? आणखी काही -
ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांचा खून केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणाजगजितसिंह पाटील हे सध्या भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर लोकसभेत पाटील ओमप्रकाश राजेनिंबाळकर या दोघांची लढत झाली होती. यातही एकमेकां वरती अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका झाली होती.
हेही वाचा -शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला