महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कळंबमध्ये वाढला मुलींचा जन्मदर; हजार मुलांमागे नऊ मुली अधिक

मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी क्रेंद आणि राज्य शासनाबरोबरच प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. जिल्ह्यातील कळंब तालुक्यात हजार मुलीमागे एक हजार नऊ मुलींचा जन्मदर झाला आहे. यामुळे कळंब तालुका हा अव्वल जिल्ह्यात असल्याचे, कळंब उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जीवन वायदंडे यांनी स्पष्ट झाले आहे.

Birth rate of girls increased in hingoli
कळंबमध्ये वाढला मुलींचा जन्मदर

By

Published : Jan 31, 2020, 8:07 AM IST

Updated : Feb 12, 2020, 8:56 PM IST

उस्मानाबाद - राज्यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असल्याचे पाहायला मिळते. मात्र, या तुलनेत जिल्ह्यातील कळंबमधील परिस्थिती अत्यंत सुखदायक परिस्थिती असल्याचे चित्र आहे. कळंब तालुक्यात एक हजार मुलींच्या मागे एक हजार नऊ मुलींची संख्या झाली आहे. यामुळे हा मुलींचा जन्मदर वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी क्रेंद आणि राज्य शासनाबरोबरच प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. जिल्ह्यातील कळंब तालुक्यात हजार मुलीमागे एक हजार नऊ मुलींचा जन्मदर झाला आहे. यामुळे कळंब तालुका हा अव्वल जिल्ह्यात असल्याचे, कळंब उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जीवन वायदंडे यांनी स्पष्ट झाले आहे. कळंब तालुक्यात 2015 पर्यत मुलींचा जन्मदर घटला होता. आरोग्य विभागाच्या पाहणीत दर हजार पुरुषामागे मुलींचा जन्मदर सुमारे 200 ने कमी होता. मात्र, आता स्थिती बदलली आहे आणि हजार मुलांमागे एक हजार नऊ मुलींचा जन्मदर झाला आहे.

कळंबमध्ये वाढला मुलींचा जन्मदर

हेही वाचा -'मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबाबत तपासणी करावी लागणार'

केंद्र आणि राज्य सरकारने मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी विविध कायदे केले आहेत. जनजागृतीसाठी व्यापक मोहीम राबविण्यात येतात. स्ञीभ्रुणहत्या थांबवणे, मुलींचे शिक्षण, सुरक्षितता, मुलींप्रती समाजात स्वागताची भावना निर्माण करणे, बालविवाह रोखणे तसेच मुला-मुलींचा जन्मदर समान ठेवणे, आदी उद्दिष्टांच्या पुर्ततेसाठी महिला आणि बालविकास विभागाने राज्यात सुकन्या योजना सुरू केली आहे. त्यानंतर या योजनेचे माझी कन्या भाग्यश्री मध्ये करण्यात आले. एकंदरीत मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबवून प्रयत्न करण्यात आले. गर्भलिंग निदानासंदर्भात कठोर कायदा केल्याने गर्भपाताचे प्रमाण शुन्य टक्क्यांवर आले. त्यामुळे मुलींच्या जन्मदारात मोठी वाढ झाल्याने सामाजिक मानसिकतेत बदल होत असल्याचे स्पष्ट झाले.

Last Updated : Feb 12, 2020, 8:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details