उस्मानाबाद -निवडणुका म्हणजे लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव. हा उत्सव शांततेत आणि शिस्तीत व्हावा यासाठी आचारसंहितेच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, काही ठिकाणी निवडणुकीच्या उत्कंठतेतून निवडणुकीचे निकाल यायच्या आधीच कोण निवडूण येईल या संदर्भात अनुमान लावले जाते. याच अनुमानांचे रूपांतर पैजेत होते आणि नंतर सट्यात. अशीच काही सट्टा प्रकरणे 'ईटीव्ही भारत'ने उजेडात आणली होती. यानंतर या सट्टाबाजांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीला आता दोन महिने उलटे असलेत, तरी या पैजेंची पूर्तता व्हायची आहे.
कहाणी दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची,अधुऱ्या शर्यतीची - करार
जिल्ह्यात १८ एप्रिलला लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले. या नंतर उस्मानाबाद जिल्ह्यात कोण खासदार निवडून येईल. यावर पैजा लागण्यास सुरुवात झाली. तर काही ठिकाणी सट्ट्ये लावण्यात आले. निवडणूकीचे निकाल येऊन दोन महिने उलटून गेले असले, तरीही या पैजांची पुर्तता झालेली नाही.
जिल्ह्यात १८ एप्रिलला लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले. या नंतर उस्मानाबाद जिल्ह्यात कोण खासदार निवडून येईल. यावर पैजा लागण्यास सुरुवात झाली. तर काही ठिकाणी सट्ट्ये लावण्यात आले. या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी बातमी 'ईटीव्ही भारत'ने लावून धरली होती. यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दोन आणि शिवसेनेच्या दोन अश्या चार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्ह्यात पहिल्यांदा राघुचीवाडी या गावातील कार्यकर्त्यांनी पैज लावली. राष्ट्रवादीचे राणाजगजितसिंह पाटील उस्मानाबादचे खासदार म्हणून निवडून आलेत तर बाजीराव करवर हे स्वतःच्या मालकीची मोटरसायकल शंकर मोरे यांच्या नावे कागदपत्रासह करून देतील. आणि जर शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे खासदार म्हणून निवडून आलेत, तर शंकर मोरे हे स्वतःची मोटरसायकल बाजीराव करवर यांच्या नावे करून देतील, असे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती नोटरी करून हा करारनामा करण्यात आला होता.
यानंतर अशाच पद्धतीचा दुसरा सट्टा हनुमंत नन्नावरे व जीवन शिंदे या दोन शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये लागला होता. यात देखील असेच शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आरटीओ पासिंगसह गाडी नावावर करुन देण्यात येईल, असा करारनामा करण्यात आला होता. या करारनाम्याची पूर्तता निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 24 एप्रिल रोजी होणार होती. मात्र, निकाल लागून शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे खासदार म्हणून निवडून आले. या सर्व प्रक्रियेला दोन महिने उलटून गेले असले, तरीही ही पैज पूर्ण झालेली नाही. अद्यापही शंकर मोरे यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीची गाडी बाजीराव यांच्या नावे केलेली नाही. तर जिल्ह्यातील दुसरी हनुमंत नन्नावरे व जीवन गोरे या दोघांची पैज देखील अजून अधुरीच आहे.