महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Teachers Students Fight Osmanabad : उस्मानाबादेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे एकमेकांविरोधात गुन्हे दाखल - Atrocity case filed against teachers

शिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी विद्यार्थीसह त्याचा भाऊ व वडिलांवर कलम 307 प्रमाणे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आनंद नगर पोलीस ठाण्यात ( Anand Nagar Police Station ) नोंद करण्यात आला आहे. तर मोटारसायकल लावण्याच्या कारणावरून शिक्षकांनी विद्यार्थी आणि त्याच्या भावाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या तक्रारीवरून मारहाण आणि ॲट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल ( Atrocity Case Filed Against Teachers ) झाला आहे.

Shripatrao Bhosale High School Osmanabad
श्रीपतराव भोसले हायस्कुल उस्मानाबाद

By

Published : Dec 3, 2021, 11:48 AM IST

Updated : Dec 3, 2021, 12:29 PM IST

उस्मानाबाद - शहरातील नामांकित असलेल्या श्रीपतराव भोसले हायस्कुल ( Shripatrao Bhosale High School Osmanabad ) येथे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये मारहाणीची ( Beatings Between Teachers and Students ) घटना घडली आहे. त्याप्रकरणी एकमेकांविरोधात गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. शिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी विद्यार्थीसह त्याचा भाऊ व वडिलांवर कलम 307 प्रमाणे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आनंद नगर पोलीस ठाण्यात ( Anand Nagar Police Station ) नोंद करण्यात आला आहे. तर मोटारसायकल लावण्याच्या कारणावरून शिक्षकांनी विद्यार्थी आणि त्याच्या भावाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या तक्रारीवरून मारहाण आणि ॲट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल ( Atrocity Case Filed Against Teachers ) झाला आहे. शहरातील प्रसिद्ध आणि नामांकित शाळेत हा गंभीर प्रकार घडल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप -

या प्रकरणात दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याबाबत दाखल तक्रारीवरून मिळालेली अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद येथील पृथ्वीराज भाऊराज मस्के व यशराज हे दोघे भाऊ परिक्षा अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबरला दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास उस्मानाबाद येथील भोसले हायस्कुल येथे मोटारसायकलने गेले होते. तेथे मोटारसायकल लावण्याच्या कारणावरुन शाळेतील शिक्षक पवार, डोलारे व कापसे यांसह अन्य व्यक्तींनी मस्के बंधूंना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली, असे मस्के याने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार कलम 323, 504, 34 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम-3 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोखंडी गजाने शिक्षकावर वार -

भोसले हायस्कुल येथील क्रीडा शिक्षक राजाभाऊ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या शाळेत 12 वीच्या वर्गात शिकत असलेला पृथ्वीराज मस्के हा विद्यार्थी शाळेतील परिसरात रस्त्यावर बुलेट आडवी लावून मुलींची छेड काढत होता. याबाबत काही मुलींनी तक्रार केल्यानंतर शिक्षक पवार यांनी याबाबत पृथ्वीराज मस्के याला जाब विचारला असता त्याने तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी दिली. त्यानंतर काही वेळाने तो एकाला घेऊन आला व पृथ्वीराज याने लोखंडी गजाने शिक्षक पवार यांच्या डोक्यावर वार केला. वार चुकवल्याने नाकावर लागल्याने गंभीर दुखापत होऊन ते रक्तबंभाळ झाले. यावेळी शाळेतील इतर शिक्षक शशिकांत जाधव व आंबेवाडीकर तिथे आले आणि मस्के याच्या तावडीतून शिक्षक पवार यांची सुटका केली.

मारहाणीत पैसे व 2 तोळ्यांचे लॉकेट पाळविल्याचा आरोप -

विद्यार्थी मस्के याने पवार यांना मारहाण करीत असताना पवार यांच्या पँटच्या पाठीमागील खिशात ठेवलेले 6 हजार 390 रुपये काढून घेतले तर त्याच्यासोबत असलेल्या मुलाने पवार यांच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट तोडून नेले. त्यानंतर या दोघांना प्राचार्य यांच्या केबिनमध्ये आणले असता तिथे पृथ्वीराज याचे वडील भाऊराज मस्के हे तिथे आले व त्यांनी शिक्षक पवार यांना जाब विचारत तुमच्यावर ॲट्रॉसिटीची कलम दाखल करतो, असे म्हणत शिक्षक पवार यांना मारहाण केली, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मारहाणीत शिक्षक राजाभाऊ पवार जखमी -

मारहाणीत शिक्षक पवार यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यात ते जखमी झाले आहेत. पवार यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहे. उपचार सुरू असताना त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पृथ्वीराज मस्के, यशराज मस्के व भाऊराज मस्के या 3 जणांवर कलम 307, 327, 323, 504 व 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांच्या तपासाकडे लक्ष -

विद्यार्थीने शिक्षकाच्या खिशातील पैसे व सोने का पळविले? शिक्षकाने विद्यार्थ्यांना जातीवाचक शिवीगाळ का केली? यासह अनेक बाबी पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहेत. भोसले हायस्कूलच्या आवारात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. त्यामुळे हा प्रकार त्यात कैद झालेला असू शकतो. शिक्षक व विद्यार्थी राडा प्रकरणाचे सत्य सीसीटीव्हीत असल्याने तपासाकडे लक्ष लागले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सहायक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे हे तपास करीत आहेत.

Last Updated : Dec 3, 2021, 12:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details