उस्मानाबाद- नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेतील बंडखोर नेते थंड पडले आहेत. खासदार रवींद्र गायकवाड समर्थक बसवराज वरनाळे यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. गायकवाड यांना तिकिट न मिळाल्याने वरनाळे यांनी बंडखोरी केली होती.
उस्मानाबादमध्ये शिवसेनेतील बंड झाले थंड, गायकवाड समर्थक वरनाळेंचा उमेदवारी अर्ज माग - बंडखोर
खासदार रवींद्र गायकवाड समर्थक बसवराज वरनाळे यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
खासदार रवींद्र गायकवाड, सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, ओम राजे निंबाळकर, ज्ञानेश्वर पाटील यांच्या उपस्थितीत हा अर्ज मागे घेण्यात आला आहे. पक्षाने तिकीट कापल्यामुळे रवींद्र गायकवाड यांनी केलेले बंड थंड झाले. मी नाराज नाही. माझे तिकीट कापल्यानंतर शिवसैनिक नाराज झाले होते. सगळ्यांची नाराजी दूर झाली असून शिवसेना आमदार ओमराजे निंबाळकर यांचा प्रचार करणार असल्याचे रवींद्र गायकवाड यांनी सांगितले आहे.
वरनाळे यांनी अर्ज मागे घेतल्याने लोकसभा उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा मार्ग मोकळा झाला आहे.