महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jode Maro Andolan : बाळासाहेबांची शिवसेनेच्यावतीने आंदोलन, राहुल गांधींच्या प्रतीकात्मक प्रतिमेस मारले जोडे - Balasaheb Shiv Sena Party

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांच्या वक्तव्याचा विरोध करीत, उसमानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी (Balasaheb Shiv Sena Party was protested in Osmanabad) करुन, त्यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेस जोडे (Rahul Gandhis statue was hit with a shoe) मारले गेले.

Jode Maro Andolan
राहुल गांधींच्या प्रतीकात्मक प्रतिमेस मारले जोडे

By

Published : Nov 18, 2022, 7:05 PM IST

उसमानाबाद :काँग्रेस नेते खा. राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रे (Bharat Jodo Yatra) दरम्यान एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले होते. याच्या निषेधार्थ बाळासाहेबांची शिवसेनेच्यावतीने, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी (Balasaheb Shiv Sena Party was protested in Osmanabad) करीत त्यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेस जोडे (Rahul Gandhis statue was hit with a shoe) मारले गेले.

प्रतिक्रिया देतांना सुरज साळुंके



दरम्यान, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते. तसेच स्वतंत्र्यासाठी त्यांचे मोठे योगदान राहिलेले असून; त्यांनी ११ वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगलेली आहे. मात्र खा. गांधी हे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशात द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खा. गांधी यांची सुरु असलेली भारत जोडो यात्रा तात्काळ थांबवावी अशी मागणी केली.

यावेळी कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, शिंदे फडणवीस सरकारच्या समर्थनार्थ घोषणा देत. खा गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. यावेळी बाळासाहेब शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, उस्मानाबाद तालुका प्रमुख अजित लाकाळ, राजाभाऊ पवार, आदीसह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details