उस्मानाबाद - दोन तासांच्या किर्तनात काही चुकीचे बोलल्याने कुणी इंदोरीकर महाराजांना नोटीस पाठवत असेल, तर हा विषय गंभीर आहे, अशी प्रतिक्रिया जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. असे बोलण्यामागे इंदोरीकरांचा उद्देश काय असावा हेही पाहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
कायदा सर्वांसाठी सारखा आहे. आमच्याकडूनही बोलताना चुका होतात. नोटीस दिली म्हणजे गुन्हा दाखल केला, असे होत नाही, असे ते यावेळी म्हणाले. दिव्यांग आणि शेतकरी मेळाव्यानिमित्त कडू तुळजापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज देण्यासाठी सरकारकडे मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.