महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मतदानाची प्रतिक्षा - Osmanabad assembly elections 2019

जिल्ह्यातील 4 मतदारसंघामध्ये भूम, वाशी, परंडा या तालुक्यांचा मिळून 1 मतदारसंघ आहे. यामध्ये तानाजी सावंत हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादीकडून राहुल मोटे हे गेली 3 टर्म विधानसभेचे नेतृत्व करत आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून सुरेश कांबळे हे या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत.

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

By

Published : Oct 20, 2019, 9:45 AM IST

उस्मानाबाद- विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावल्या. उस्मानाबाद जिल्ह्यात 4 विधानसभा मतदारसंघ असून या चारही विधानसभा मतदारसंघात त्रिशंकू होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. वंचित बहुजन आघाडी, युती आणि महाआघाडी यांमध्येही या प्रमुख लढती होणार आहेत.

निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

जिल्ह्यातील 4 मतदारसंघामध्ये भूम, वाशी, परंडा या तालुक्यांचा मिळून 1 मतदारसंघ आहे. यामध्ये तानाजी सावंत हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादीकडून राहुल मोटे हे गेली 3 टर्म विधानसभेचे नेतृत्व करत आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून सुरेश कांबळे हे या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा -उस्मानाबादेत बरसतोय परतीचा पाऊस

तर कळंब उस्मानाबाद हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, राणाजगजितसिंह-पाटील यांच्या भाजप प्रवेशाने या मतदारसंघात बऱ्याच प्रमाणात बदल झाले आहेत. येथून शिवसेनेकडून कैलास पाटील निवडणूक लढवत आहेत. तर राष्ट्रवादीकडून संजय निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वंचितकडून धनंजय शिंगाडे हे निवडणूक लढवत आहेत.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसची सत्ता आहे. मधुकर चव्हाण हे 5 टर्म येथील आमदार आहेत. ते सहाव्यांदा आपल नशीब आजमावत आहेत. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले राणाजगजितसिंह पाटील यांनी आपले दंड थोपटले आहेत. या दोघांची लढत ही चुरशीची होणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून अशोक जगदाळे यांनी या दोघांनाही आव्हान दिले आहे.

हेही वाचा -ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी दिली होती 12 लाखांची ऑफर - अपक्ष उमेदवार दत्ता तुपे

उमरगा-लोहारा या 2 या तालुक्यात गेली शिवसेनेची सत्ता आहे. सलग 2 टर्म आमदार राहिलेले ज्ञानराज चौगुले हे तिसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात आहेत. यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसचे भालेराव आणि वंचित बहुजन आघाडीचे रमाकांत गायकवाड त्याचबरोबर मनसेने आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर जालिंदर कोकणे यांनीही चौगुलेंना आव्हान दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details