उस्मानाबाद - उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी बागायतदार शेतकऱ्यांना 50 हजार रुपये आणि इतर शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपयांची मदत देऊ असे सांगितले होते. मात्र अता उद्धव ठाकरे सत्तेत आल्यानंतर त्यांना या आश्वासनाचा विसर पडला असून त्यांची अवस्था गजनी चित्रपटातील आमिर खान सारखी झाल्याची खोचक टीका माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंची अवस्था 'गजनी'च्या आमिर खानसारखी; अनिल बोंडेंचा सरकारवर निशाणा - अनिल बोंडे बातमी
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याची गरज नसून बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली आहे. केंद्राने पारित केलेल्या कृषी विषयक कायद्यासंदर्भात त्यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच राज्य सरकारला लक्ष करत फटकेबाजी केली.
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याची गरज नसून बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली आहेत. केंद्राने पारित केलेल्या कृषी विषयक कायद्यासंदर्भात त्यांनी आज पत्रकार परिषद आयोजीत केली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच राज्य सरकारला लक्ष करत फटकेबाजी केली.
अद्याप सरकारचा एकही मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेला नाही, उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे सध्याचे मंत्री हे 'स्वतःचे कुटुंब; स्वतःची जबाबदारी' सांभाळत असून शेतकऱ्यांच्या कुटुंबाला या मंत्र्यांनी वाऱ्यावर सोडले आहे,, असे बोंडे म्हणाले.
बदल्याच्या भावनेतूनच 'जलयुक्त शिवार'ची चौकशी
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. या प्रकल्पाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे. हा प्रकार बदल्याच्या भावनेतून सुरू असल्याची टीका बोंडे यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरू केलेल्या वेगवेगळ्या योजनांना स्थगिती देण्यात येत आहे. त्यामुळे या चौकशीला मी स्वतः जातीने हजर राहून एसआयटीला सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले.