उस्मानाबाद- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेहुणे, बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचे धाकटे बंधू व माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे बंधू अमरसिंह बाजीराव पाटील (वय 50) यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर त्यांच्या मूळ तेर या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी अजित पवार हे हजर होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचे निधन - Amar Singh Patil
अमरसिंह पाटील हे व्यासंगी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. काही काळ त्यांनी शेतीपूरक व्यवसायही केला होता.
अमरसिंह पाटील
ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. अखेर शनिवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. अमरसिंह पाटील हे व्यासंगी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. काही काळ त्यांनी शेतीपूरक व्यवसायही केला होता.