उस्मानाबाद - जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना यांनी मोहा गावातील दारू विक्री विरोधात जोरदार आंदोलन केले.
पोलीस ठाण्यासमोरच दारू विक्री करून आंदोलन; उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकार - वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद आंदोलन
वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना यांनी मोहा गावातील दारू विक्री विरोधात जोरदार आंदोलन केले. मोहा गावातील महिलांनीही यात सहभाग घेतला.
मोफत दारू विक्री करताना मोहा गावातील महिला
हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयोगाची भेट
दोन्ही गटांच्या सोबतच मोहा गावातील महिलांनीही यात सहभाग घेतला. कळंब पोलीस ठाण्यासमोरच मोफत दारू विक्री करून अनोखे आंदोलन करण्यात आले. अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात पोलिस कारवाई करत नाहीत, म्हणून पोलिसांचा आंदोलनकर्त्यांनी निषेध केला. यातून पोलिसांची निष्क्रियता आणि खाबूगिरी समोर आली आहे.