महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

COVID-19 : उस्मानाबादची वाटचाल रेड झोनच्या दिशेने... - उस्मानाबाद कोरोना न्यूज

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा असून जिल्ह्यात एकूण सात रुग्ण आढळले आहेत. गेली काही दिवस जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, आता ऑरेंजमधून रेड झोनकडे वाटचाल सुरू असल्याचे पाहायला मिळते आहे.

corona in osmanabad
corona in osmanabad

By

Published : May 18, 2020, 7:17 AM IST

उस्मानाबाद - जिल्ह्यात रविवारी नव्याने ३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापूर्वीची जिल्ह्यातील परंडा तालुक्यात 1 आणि कळंब तालुक्यात 3 कोरोना रुग्ण आढळले होते. त्यानंतर रविवारी पुन्हा कळंब तालुक्यातील २ आणि भूम तालुक्यातील एका रुग्णाची भर पडली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा असून जिल्ह्यात एकूण सात रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. गेली काही दिवस जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, आता ऑरेंजमधून रेड झोनकडे वाटचाल सुरू असल्याचे पाहायला मिळते आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details