उस्मानाबाद- जानेवारी २०२० मध्ये सुरू होत असलेले ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठवाड्यातील सातवे साहित्य संमेलन आहे. यापूर्वी औरंगाबाद, नांदेड, परभणी, परळी वैजनाथ, आंबेजोगाई येथे साहित्य संमेलन झाले आहे.
तब्बल १६ वर्षानंतर मराठवाड्यात मराठी साहित्य संमेलन; उस्मानाबादला मिळाला मान - 93 Marathi Literature Summit
२००४ साली परत औरंगाबाद येथे रा.ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन घेण्यात आले. २००४ नंतर प्रथमच २०२० साली उस्मानाबाद येथे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन घेण्यात येत आहे. साहित्य समेंलनाबाबत मराठवाड्याचा इतिहास सांगताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी
सुरुवातीला १९५७ ला ३९ वे साहित्य संमेलन औरंगाबाद येथे घेण्यात आले होते. त्यावेळी अनंत काणेकर हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर १९८३ ला अंबाजोगाई येथे साहित्य संमेलन घेण्यात आले. व्यंकटेश माडगूळकर हे त्यावेळी अध्यक्ष होते. त्यानंतर १९८५ ला नांदेड येथे घेण्यात आलेल्या साहित्य संमेलनात शंकर बाबाजी पाटील अध्यक्ष होते. त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी १९९५ ला ६८ वे साहित्य संमेलन परभणी येथे घेण्यात आले. तर ३ वर्षात द. मा. मिरासदार यांच्या अध्यक्षतेखाली १९९८ साली परळी वैजनाथ येथे साहित्य संमेलन घेण्यात आले. २००४ ला परत औरंगाबाद येथे रा. ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन घेण्यात आले. २००४ नंतर प्रथमच २०२० ला उस्मानाबाद येथे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन घेण्यात येत आहे.
हेही वाचा-मराठवाड्यात पहिल्यांदाच नव्हे, तर यापूर्वीही झाले होते साहित्य संमेलन