महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक..! 282 किलो बनावट खवा जप्त - अन्न व औषध प्रशानसन

गुरुवारी बनावट खवा एसटी बसद्वारे येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाली. त्यांनी कारवाई करत तब्बल २८२ किलो बनावट खवा रंगेहात पकडला. याबाबत स्वामी समर्थ खवा विक्री केंद्रावर सदर खवा जप्त करून तो नष्ट करण्यात आला. तसेच विक्री केंद्राला सील करून त्यावर कारवाई केली.

osmanabad
बनावट खवा जप्त

By

Published : Dec 20, 2019, 3:31 PM IST

उस्मानाबाद - जिल्ह्यातील भूम तालुक्यात कोल्हापूर माजलगाव या बसमधून आणलेल्या ८ गोण्यातील सुमारे २८२ किलो खवा जप्त अन्न व औषध प्रशानसनाने गुरुवारी जप्त केला. हा खवा सांगली जिल्ह्यातल्या येरमाळा येथील खवा केंद्रातून आणण्यात येत होता.

282 किलो बनावट खवा जप्त

जिल्ह्यातील भूम तालुका हा दुधाचे पदार्थ बनवण्यासाठी प्रसिद्ध असून कुंथलगिरी येथे चांगल्या दर्जाचा खवा मिळतो. जिल्ह्यातील इतर ठिकाणी खवा विक्री जोरात वाढली आहे. परंतु, इतर ठिकाणी शुद्ध खवा विकला जात नसून सांगली येथून येणारा बनावट खवा आढळतो आहे. हा बनावट खवा येरमाळा येथील खवा वितरण केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात पाठवला जात असल्याचा प्रकार समोर आला. याबाबत अन्न व औषध प्रशासनाने वारंवार धाडी मारल्या. मात्र, बनावट खवा हाती लागत नव्हता. मात्र, गुरुवारी बनावट खवा एसटी बसद्वारे येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाली. त्यांनी कारवाई करत तब्बल २८२ किलो बनावट खवा रंगेहात पकडला. याबाबत स्वामी समर्थ खवा विक्री केंद्रावर सदर खवा जप्त करून तो नष्ट करण्यात आला. तसेच विक्री केंद्राला सील करून त्यावर कारवाई केली.

हेही वाचा -छेड काढणार्‍या टवाळखोराला मुलींनी दिला चोप

येरमाळा येथील खवा केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात दुधापासून तयार केलेला खवा वितरण अनेक वर्षापासून केले जात होते. त्यामुळे खवा केंद्र म्हणून येरमाळा केंद्राची देखील ओळख निर्माण झाली होती. मात्र, गेल्या ६ महिन्यांपासून या शुद्ध खवा वितरण केंद्राला बनावट खव्याचे ग्रहण लागले होते. यातच, कोल्हापूर माजलगाव या बसमधून आलेला ८ गोण्यातील सुमारे २८२ किलो खवा जप्त करण्यात आला. या बनावट खव्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहेत. तर, उर्वरित २८० किलो बनावट खवा येरमाळा कळंब रोडवरील तेरणा नदीच्या पाण्यात नष्ट करण्यात आला.

औषध प्रशासन विभागाच्या रेणुका पाटील व सहाय्यक आयुक्त कृष्णा दाभाडे यांनी मिळून ही कारवाई केली. या कारवाईत भीमराव डांगे यांच्या मालकीच्या स्वामी समर्थ खवा विक्री केंद्राला सील ठोकण्यात आले आहे. सांगली येथून येणारा खवा हा डालडा, डिटर्जंट पावडर, शॅम्पू, सोयाबीन आणि निकृष्ट दूध पावडर यांच्यापासून तयार केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा -उस्मानाबाद: उसाचा भरलेला ट्रक स्ट्रीट लाईटच्या खांबावर आदळला, ६५ हजाराचे नुकसान

ABOUT THE AUTHOR

...view details