उस्मानाबाद- विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार ओमप्रकाश राजेनिबाळकर यांच्यावर चाकू हल्ला केलेला आरोपी तरुण पोलिसांच्या ताब्यात पळून गेला आहे. या आरोपीचे नाव अजिंक्य टेकाळे असून तो पळून गेल्याने पोलिसांंच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित होत आहे.
धक्कादायक: खासदारांवर चाकू हल्ला करणारा हल्लेखोर पोलिसांच्या हातून पळाला - तरुणाचा खासदारांवर हल्ला
विधानसभा उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर गेले होते यावेळी यादरम्यान हातात हात देत अजिंक्य टेकाळे याने चाकू हल्ला करून खासदारांना जखमी केले होते.
पडुळी-नायगाव येथे विधानसभा उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार राजेनिंबाळकर गेले होते. यावेळी हातात हात देत अजिंक्य टेकाळे याने चाकू हल्ला करून खासदारांना जखमी केले होते. त्यावेळपासून अजिंक्य हा पोलिसांच्या ताब्यात होता.
मात्र आज पोलिसांना चकवा देवून तो पळून गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आज अजिंक्य यास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र रुग्णालयातून तात्पुरत्या जेलमध्ये आल्यानंतर जेल पोलिसांच्या हातावर तुरी देऊन टेकाळे हा पसार झाला आहे.