उस्मानाबाद -मुरुड अंबाजोगाई या रस्त्यावरील नायगाव या गावात चारचाकी वाहनाचा अपघातात झाल्याने शिक्षक महिलेचा मृत्यू झाला. नायगाव येथील बस स्थानकापासून काही अंतरावर हा अपघात झाला असून यातील सर्व प्रवासी शिक्षक होते. गाडी अचानक पलटी झाल्याने हा अपघात झाला.
शिक्षकांच्या गाडीला अपघात, महिला शिक्षिकेचा मृत्यू - उस्मानाबाद पोलिस बातमी
मुरुड-अंबाजोगाई रोडवरील नायगाव गावात चारचाकी वाहनाचा अपघात झाला. अपघातात एका महिला शिक्षकेचा मृत्यू झाला.
शिक्षकांच्या गाडीला अपघात, महिला शिक्षिकेचा मृत्यू
अपघातात जखमी झालेल्यांना प्रथमोपचारासाठी मुरुड येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुरुड वरून शिराढोण (ता. कळंब) येथील शाळेला जात आसताना हा अपघात घडला. अपघातामध्ये ज्योती माकोडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मंजुषा पवार, शितल जाघव, राजेंद्र मचाले, कान्तीला गणगे हे सर्व शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत.