महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साहित्याची भूक भागवण्यासाठी पायी, सायकलसह विमानाने केला 'या' व्यक्तीने प्रवास

साहित्याची भूक भागवण्यासाठी कोण कुठला प्रयोग अवलंबवेल हे काहीच सांगता येत नाही. फुलचंद नागटिळक हे असे अवलिया आहेत की ज्यांनी २७ साहित्यसंमेलन पाहिले आहेत. काही वेळेला पायी चालत जाऊन, सायकलने जाऊन, माल वाहतूक ट्रक तर कधी विमानात जाऊनही त्यांनी साहित्य संमेलनाला हजेरी लावली आहे. हे नागटिळक यांनी फक्त साहित्याची भूक भागवण्यासाठी केले.

osmanabad
फुलचंद नागटिळक

By

Published : Jan 11, 2020, 11:11 PM IST

उस्मानाबाद- साहित्याची भूक भागवण्यासाठी कोण कुठला प्रयोग अवलंबवेल हे काहीच सांगता येत नाही. फुलचंद नागटिळक हे असे अवलिया आहेत की ज्यांनी सत्तावीस साहित्यसंमेलन पाहिले आहेत. काही वेळेला पायी चालत जाऊन, सायकल ने जाऊन, माल वाहतूक ट्रक तर कधी विमानात जाऊनही त्यांनी साहित्य संमेलनाला हजेरी लावली आहे. हे नागटिळक यांनी फक्त साहित्याची भूक भागवण्यासाठी केले. त्यांच्याशी चर्चा केली 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी कैलास चौधरी यांनी.

फुलचंद नागटिळक यांच्याशी चर्चा करताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी कैलास चोधरी

नागटिळक यांनी सुरुवातीला कोल्हापूर येथे १९९२ साली झालेल्या साहित्य संमेलनाला हजेरी लावली. त्यानंतरचे प्रत्येक साहित्य संमेलनात फुलचंद नागटिळक यांनी सहभाग घेतला. कोल्हापूर, सातारा, घुमान, परभणी, आळंदी, अहमदनगर आणि पणजी येथील साहित्य संमेलनात देखील ते सहभागी झाले होते. पणजीतील साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी नागटिळक यांनी चक्क माढा तालुक्यातील त्यांच्या खैरगाव गावापासून पणजीपर्यंत पायी प्रवास केला होता. तर, परभणी येथे झालेल्या साहित्य संमेलनाला ते सायकलने गेले होते. इतकेच नव्हे तर अंदमान येथे झालेल्या साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी त्यांनी विमानाने देखील प्रवास केला होता. हा प्रवासाचा सर्व खर्च इतर लोकांनी केला.

नागटिळक यांना फक्त साहित्य संमेलनाची आवड आहे असे नाही. ते कीर्तन करतात. नटसम्राट या नाटकाचा एकपात्री प्रयोगही फुलचंद पार पडतात. आत्तापर्यंत नटसम्राटचे ५३१० एकपात्री प्रयोग नागटिळक यांनी सादर केले आहेत. शाळा-महाविद्यालय, वाड्या-वस्त्या, युवा फेस्टिवल, अशा ठिकाणी जाऊन त्यांनी नटसम्राट या नाटकाचे एकपात्री प्रयोग सादर केले आहेत. शिक्षकांनी कसे शिकावावे आणि कसे शिकवे हा विषय घेऊन त्यांनी ३२०० महाविद्यालयात जाऊन लेक्चर दिले आहेत. संत गाडगेबाबा यांचा पोशाख घालून अगदी ते वेगवेगळ्या कार्यक्रमाला, साहित्य संमेलनाला जातात. बारावी नापास असलेल्या नागटिळकांची माय भूमी हा काव्यसंग्रह सोलापूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात प्रकाशित झाला.

दिसायला आणि परिस्थितीने सर्वसाधारण असलेल्या नागटिळकांची कुसुमाग्रजांनी १९९७ साली भेट घेतली. त्यानंतर कुसुमाग्रजांनी ते करत असलेल्या कामाबद्दल नागटिळकांना शुभेच्छा पत्र लिहिलेले आहे. साहित्यातील दिग्गज लोक देखील फुलचंद नागटिळक यांना ओळखतात. आनंद यादव, जगदीश खेबुडकर, नारायण सुर्वे, यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे. तर शांता शेळके, विंदा करंदीकर यांची भेट घेतली आहे. राजा मंगळवेढेकर, इंद्रजीत भालेराव, विठ्ठल वाघ, फ.मू. शिंदे पासून ते साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यापर्यंत सर्व लोक नागटिळक यांना ओळखतात. फुलचंद नागटिळक यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे. पाच मराठी चित्रपट आणि एका हिंदी चित्रपटात त्यांनी आपली भूमिका सादर केली आहे. त्याचबरोबर, प्रेम रंग, घुंगराची साथ, कुराड एक घाव प्रेमाचा, अशा चित्रपटांमध्ये तर हिंदीमध्ये असलेला बाबासाहेब या चित्रपटात त्यांनी आपली कला सादर केली. अगदी भारतात कुठेही साहित्य संमेलन भरवले तरी मी तेथे जाणार, अशी ठाम भूमिकाच नाग टिळकांची असते.

हेही वाचा-'पुस्तक चाळण्यात जी मजा आहे ती ई-बुक मध्ये कुठे?'

ABOUT THE AUTHOR

...view details