नंदुरबार- तळोदा तालुक्यातील आमलाड शिवारातील शेतात बिबट्याने दोन कुत्र्यांवर हल्ला केला होता. कुत्र्यांवर हल्ला करणार्या बिबट्या वनविभागाच्या ट्रॅप कॅमेर्यात कैद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने आमलाड शिवारात धुमाकूळ घातला होता.
तळोदा तालुक्यातील अमलाड शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. लोक असल्यामुळे जंगल शिवारात निर्मनुष्य असल्यामुळे बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून त्यांना फस्त केले होते. नितिन वाणी यांच्या शेतात बिबट्याने कुत्र्यांवर हल्ला केल्यानंतर परिसरात दहशत निर्माण झाली होती. नगरसेवक गौरव वाणी यांनी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. वनविभागाने याची दखल घेत दोन ट्रॅप केमॅरे लावले होते. त्यात मंगळवारी (दि. 5 मे) रात्री शेतात फिरणारा बिबट्या कॅमेर्यात कैद झाला होता. बुधवारी (दि. 6 मे) सकाळी या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.