उस्मानाबाद- जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यात एका शेतामध्ये आकाशातून सोनेरी दगड पडल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी एक शेतकरी आपल्या शेतामध्ये काम करत असतानाच अचानक आकाशातून एक दगड खाली पडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आकाशातून उल्कापात पडल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. याबाबतचे संशोधन भूवैज्ञानिक विभाग करत आहेत.
हेही वाचा -हवामान खात्याचा इशारा : रविवारपासून राज्यभरात मुसळधार पावसासह चक्रीवादळाची शक्यता
- वाऱ्यासारखा आवाज आला आणि दगड पडला -
प्रभू निवृत्ती माळी नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात हा दगड पडला आहे. माळी यांनी आपल्या शेतात भाजीपाल्याचं पीक घेतलं आहे. पण गुरुवारी रात्री उस्मानाबाद परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे शेतातील वाफ्यात पाणी साचलं आहे का? हे पाहण्यासाठी माळी आपल्या शेतात गेले होते. दरम्यान, शुक्रवारी साडेसहाच्या सुमारास वाफ्याची पाहणी करताना अचानक वाऱ्यासारखा आवाज झाला. काही कळायच्या आतच माळी उभे असलेल्या ठिकाणापासून सात-आठ फूट अंतरावर आकाशातून दोन किलो 38 ग्रॅम वजनाचा सोनेरी दगड पडला.
- तपासणीसाठी दगड भूवैज्ञानिक विभागाकडे पाठवला -