महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू - osmanabad news

शेतात मशागतीच्या वेळी ट्रॅक्टरला रोटर लावून काम सुरू असताना यात अडकून आत ओढला गेल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला.

पृथ्वीराज संतोष बेद्रे

By

Published : Nov 22, 2019, 5:44 PM IST

उस्मानाबाद- जिल्ह्यातील वरवंटी येथे धक्कादायक घटना घडली आहे. शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत सुरू असताना ट्रॅक्टरच्या पाठीमागे जोडलेल्या रोटरमध्ये अडकून लहान मुलाचा मृत्यू झाला. पृथ्वीराज संतोष बेद्रे (वय 13) असे या मृताचे नाव आहे.


दुपारी 12.00 ते 01.00 च्या सुमारास वरवंटी येथे शेतात मशागतीच्या वेळी ट्रॅक्टरला रोटर लावून काम सुरू होते. यात अडकून मुलगा आत ओढला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. संबंधित ट्रॅक्टरचालक राकेश जनार्दन कांबळे याच्या विरोधात ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालवल्याचा आरोप करत संतोष मल्लीकार्जुन बेंद्रे यांनी फिर्याद नोंदवत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

कांबळे याच्या विरूद्ध उस्मानाबाद (ग्रामीण) पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details