महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संमेलनाचा उद्घाटन समारंभ दिमाखात संपन्न; गोरोबा काका नगरीत साहित्य प्रेमींचा उत्साह

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली. यंदाच्या संमेलानाच्या यजमानपदाचा मान हा उस्मानाबादला मिळाला आहे. ज्येष्ठ कवी, पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते यावर्षीच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. तर, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुरुवातीचे मनोगत व्यक्त केले.

93rd All India Marathi Literature Fest to begain from today in Osmanabad
ग्रंथदिंडीला सुरूवात

By

Published : Jan 10, 2020, 5:24 AM IST

Updated : Jan 10, 2020, 11:16 PM IST

उस्मानाबाद -93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली. यंदाच्या संमेलानाच्या यजमानपदाचा मान हा उस्मानाबादला मिळाला आहे. ज्येष्ठ कवी, पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते यावर्षीच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. तर, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुरुवातीचे मनोगत व्यक्त केले. त्यांची तब्येत गुरुवारपासून खालावली असल्याचे सांगितले जात होते. मात्र, ते संमेलनाला उपस्थित राहिले.

साहित्याची जत्रा : संत गोरोबा नगरी सजली
संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी व्यासपीठ सज्ज

LIVE :

  • 5.00 PM - उद्घाटन कार्यक्रमास सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, मधुकर चव्हाण, आमदार बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती.
  • 4.42 PM - उद्घाटन म्हणून ना. धो. महानोर संमेलनाचे अध्यक्ष फादर फादर दिब्रिटो, मावळत्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांची उपस्थिती.
  • 4.40 PM - संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी व्यासपीठ सज्ज ; गोरोबा काका नगरीत मान्यवरांची उपस्थिती
  • 11.40 AM - ग्रंथदिंडी अंतिम टप्प्यात, ठिकठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अल्पोपाहाराची सोय
  • 11.30 AM - काही विद्यार्थ्यांच्या हातात पर्यावरणाचा जागर करणारी फलके
  • 11.25 AM - विद्यार्थ्यांनी साकारली वनवासी वेशभूषा, विद्यार्थिंनीनी नेसल्या नववारी साडी
  • 10:47 AM - ग्रंथदिंडी समता चौकात पोहोचली... आणखी 2 तास चालण्याची शक्यता
  • 10:47 AM - विविध शाळेतील विद्यार्थ्यांकडून वारकरी संप्रदाय, आदिवासी नृत्य, लेझीम पथकही सादरीकरण, विविध संस्कृतीचे दर्शन ग्रंथदिंडीत पाहावयास मिळत आहे... आपली परंपरा, संस्कृती लोकांना कळावी हा उद्देश
  • 10.24 AM - विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही सहभागी, विद्यार्थांच्या विकासासाठी साहित्य संमेलनाचा फायदा होणार - शिक्षकाची प्रतिक्रिया
  • 10:26 AM - महिला वर्गात उत्साहाचे वातावरण, अनेक ठिकाणांवरून साहित्यप्रेमी ग्रंथदिंडीत सहभागी... वसईवरून 700 ते 800 साहित्यप्रेमी गोरोबानगरीत दाखल
  • 10:24 AM - विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही सहभागी, विद्यार्थांच्या विकासासाठी साहित्य संमेलनाचा फायदा होणार - शिक्षकांची प्रतिक्रिया
  • 10:14 AM - ग्रंथदिंडी समता चौक, पोलीस अधीक्षक कार्यालय मार्गे जाईल...
  • 10:00 AM - टाळ मृदूंगाचा गजर; विद्यार्थ्याचा उत्साह शिगेला... विद्यार्थ्यांनी साकारली श्री विठ्ठल-रुख्मिणी, शिवाजी महाराज, जिजामातांची वेशभूषा
  • 09:32 AM - ग्रंथदिंडीत हजारो विद्यार्थी सहभागी; ढोल-ताशाचा गजर आणि उस्मानाबादकारांचा उत्साह
  • 09:30 AM - ग्रंथदिंडीला सुरुवात,

'गोरोबा काका नगरी'मध्ये पार पडणार संमेलन..

उस्मानाबादमधील थोर संत गोरोबा काका, यांच्या नावावरून संमेलनाच्या जागेला 'गोरोबा काका नगरी' असे नाव देण्यात आले आहे. याठिकाणी साहित्य रसिकांना पुस्तके खरेदी करता यावीत यासाठी भव्य ग्रंथालयही उभारण्यात आले आहे.

आली साहित्याची वारी.. गोरोबांच्या दारी!

संत गोरोबा यांच्या नावावरूनच यावर्षीच्या साहित्य संमेलनाचे 'थीम साँग' हे 'आली साहित्याची वारी.. गोरोबांच्या दारी' असे रचण्यात आले आहे. प्रसिद्ध गीतकार वैभव देशमुख यांनी हे गाणं लिहिले आहे. संत गोरोबा काका, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची महती सांगणारे हे गाणं आहे. या गाण्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील सांस्कृतिक वारसा जपणारी ढोल, संबळ, खंजिरी आदी पारंपरिक वाद्ये वाजवण्यात आली आहेत. हृषीकेश यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.

हेही वाचा : उस्मानाबादमध्ये पहिल्यांदाच नव्हे, तर यापूर्वीही झाले होते साहित्य संमेलन

साहित्य संमेलन आणि वाद..

सालाबादप्रमाणे यावर्षीही साहित्य संमेलनाला जोडून वाद-विवाद सुरूच होते. यावर्षी फादर दिब्रिटो यांची अध्यक्षपदी निवड करण्यावरून वाद निर्माण झाला होता. फादर दिब्रिटो यांचे साहित्य हे ख्रिस्ती धर्मावर आधारित असल्यामुळे त्यांची अध्यक्षपदी निवड करू नये, अशी मागणी एका वर्गाकडून करण्यात येत होती. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने अध्यक्षपदासाठी दिब्रिटो यांचे नाव सुचवल्यानंतर त्यांची एकमताने संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

हेही वाचा : 'आईनेच दिला मराठीचा पहिला धडा'; फ्रान्सिस दिब्रिटो यांची विशेष मुलाखत

महानोर यांना धमकी, मात्र तरीही राहणार उपस्थित..

साहित्य संमेलनाचे उद्घाटक, पद्मश्री ना. धों. महानोर यांना काल (गुरूवार) या संमेलनाला जाऊ नका, अशा आशयाच्या धमक्या देणारे फोन आले होते. वारंवार असे फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, तरीही आपण या संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनीही फोन करून संमेलनाला जाऊ नका असे सांगितल्याचा गौप्यस्फोटही महानोरांनी केला. या पार्श्वभूमीवर, ते सध्या राहत असलेल्या उस्मानाबाद येथील हॉटेलबाहेर कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

हेही वाचा : साहित्याची जत्रा: बोली भाषेच्या संवर्धनासाठी उचललेलं पाऊल स्वागतार्हच, ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांचे मत

Last Updated : Jan 10, 2020, 11:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details