उस्मानाबाद - शहर पोलिसांनी सोमवारी एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत २ लाख ५० हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उस्मानाबादमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; २ लाखांचा मुद्देमाल जप्त - GAMBLE
या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्यांच्याकडून रोख रकमेसह दुचाकी आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत जाकेर बाबू तांबोळी, सागर भांडवले, आमीर मुक्तार सय्यद, जुबेर रब्बानी शेख, अकबर नजमोद्दीन खान, आसीफ नबी तांबोळी, मोहम्मद रफीक तोंबोळी, दयानंद सिरसाट यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोख रकमेसह दुचाकी आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
या कारवाईत ८ हजार ७० रुपये रोख, २ लाख ३५ हजार रकमेच्या ८ दुचाकी, २.४८ लाख रुपयांचे मोबाईल तसेच, जुगाराचे इतर साहित्य जप्त केले गेले. आरोपीविरुद्ध उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.