उस्मानाबाद - जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार जवळपास 56.50 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील चार मतदारसंघात एकूण मतदान 13,15,952 आहे तर फक्त 7,43,484 मतदान झाले. सर्वच मतदारसंघातील निवडणूक तिरंगी होती. महायुती आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी निवडणूक जिल्ह्यात झाली. सर्वच पक्षांनी प्रचाराचे वेगवेगळे फंडे अवलंबत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अपक्ष व विविध पक्षांकडून 50 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यांचे भवितव्य आज ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले.
उस्मानाबादमध्ये लोकशाहीचा उत्सव पडला पार, ५ वाजेपर्यंत 56 टक्के मतदान
उस्मानाबाद जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रिया पार पडली. सांयकाळी ५ वाजेपर्यंत ५६% सुमारे मतदान झाले.
उस्मानाबादमध्ये 56 टक्के मतदान
जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील टक्केवारी -
उमरगा | तुळजापूर | उस्मानाबाद | परांडा |
51.65% | 57.13% | 54.16% | 63.01% |