उस्मानाबाद- जिल्ह्यातील येडशी जवळ बैलगाडीला ट्रकने उडवले आहे. यात दोन लहान मुलांसह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ऐन वेळ अमावस्येच्या सणाला ही घटना झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
उस्मानाबादमध्ये वेळ अमावस्या उरकून परतणाऱ्या बैलगाडीला उडवले ट्रकने; चार जणांसह बैलांचा मृत्यू - उस्मानाबाद अपघात बातमी
वेळ अमावस्या निमित्त बैलगाडीतील सर्व जण शेतात गेले होते. शेतातील पूजा वनभोजन उरकून हे कुटुंब घरी येत होते. दरम्यान, येरमाळा-येडशी रोडवर, वडगाव पाटीजवळ या बैलगाडीला ट्रकने उडवले. यात दोन बैलांचाही जागीच मृत्यू झाला आहे.
वेळ अमावस्येनिमित्त बैलगाडीतील सर्व जण शेतात गेले होते. शेतातील पूजा वनभोजन उरकून हे कुटुंब घरी येत होते. दरम्यान, येरमाळा-येडशी रोडवर, वडगाव पाटीजवळ या बैलगाडीला ट्रकने उडवले. यात दोन बैलांचाही जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना उस्मानाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
युवराज शेटे (वय वर्ष 7), गुंजन माळवदे (13 वर्ष), फनुबाई पवार (वर्ष 50), रेश्मा माळवदे (वर्ष 40) असे मृत व्यक्तींची नावे आहेत. तर दत्तात्रय शेटे (वर्ष 35) हे जखमी झाले आहेत.