महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बार्शी ते कळंब पायी निघालेल्या 32 मजुरांना पोलिसांनी घेतले ताब्यात - osmanabad corona

32 शेतमजूर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून नांदेडला पायी चालत निघाले होते. लॉकडाऊन नंतर या मजुरांच्या हातातील काम थांबले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या गावाची वाट धरली.

kalamb police
बार्शी ते कळंब पायी निघालेल्या 32 मजुरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By

Published : Apr 3, 2020, 5:41 PM IST

Updated : Apr 3, 2020, 8:46 PM IST

उस्मानाबाद - लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही आणि पोटाला अन्न नाही या विवंचेनेत सापडलेले नांदेड जिल्ह्यातील शेतमजूर बार्शीहून पायी आपापल्या गावी निघाले होते. या ३२ शेतमजुरींना त्यांच्या कुटुंब कबिल्यासह कळंब पोलिसांनी पकडले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पायी प्रवास करून आज (शुक्रवारी) ते सर्व कळंब येथे पोहचले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. गेल्या तीन दिवसांपासून ते शक्यतो रात्रीचा प्रवास करत होते आणि मुक्कामासाठी गावाच्या बाहेरच शेतमाळावर आश्रय घेत होते. अशा अंधारात प्रवास करून त्यांना नांदेड येथे पोहचायचे होते. मात्र, आज कळंब येथे पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन शहरातील कन्या शाळेत ठेवले आहे. या शेतमजुरांसोबत त्यांची बायका-मुलं आणि कपड्यालत्त्याची गाठोडी आहेत. या सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी कळंब उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर येणार आहेत.

बार्शी ते कळंब पायी निघालेल्या 32 मजुरांना पोलिसांनी घेतले ताब्यात
बार्शी ते कळंब पायी निघालेल्या 32 मजुरांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Last Updated : Apr 3, 2020, 8:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details