उस्मानाबाद- मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा समाजाच्या वतीने मुक मोर्चा, ठोक मोर्चा काढल्यानंतर आता पायी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, आरक्षणाच्या मागणीसाठी या पंढरपूर ते मंत्रालय या आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या कळंब तालुक्यातील मराठा समाज बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पंढरपूर ते मंत्रालय मोर्चामध्ये सहभागी होण्यापूर्वीच मराठा कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपुरातून आक्रोश मोर्चा काढण्याचै जाहीर होताच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दखल घेत जिल्हा प्रशासनाने सोलापूर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागु केले आहेत. त्यातच या आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेल्या कळंब येथील मराठा बांधवाना पोलिसांनी ताब्यात घेऊन नोटीस बजावल्या आहेत.
आक्रोश मोर्चात सहभागी होणारच-
आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपुरातून आक्रोश मोर्चा काढण्याचै जाहीर होताच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दखल घेत जिल्हा प्रशासनाने सोलापूर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागु केले आहेत. त्यातच या आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेल्या कळंब येथील मराठा बांधवाना पोलिसांनी ताब्यात घेऊन नोटीस बजावल्या आहेत. मात्र तरीही मराठा बांधव पायी आक्रोश मोर्चात सहभागी होण्यावर ठाम आहेत. सरकारने अशा कितीही नोटीस दिल्या तरी आरक्षणासाठी संघर्ष करतच राहणार असल्याची प्रतिक्रिया आंदोलकांकडून देण्यात येत आहे.
149 प्रमाणे बजावल्या नोटीस-
मराठा आरक्षणासाठीचा मुद्दा आता पेटला असला तरी, राज्यात दुसरीकडे कोरोनाचा धोकाही अद्याप टळलेला नाही. मराठा आंदोलनात होणारी संभाव्य गर्दी टाळण्याच्या दृष्टीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाे जमावबंदीचा आदेश लागू केला. त्याच अनुषंगाने कळंब तालुक्यातील 15 मराठा कार्यकर्त्यांना 149 अन्वये नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.