महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...म्हणून महिला दिनी युवा स्वाभिमानी महिला पक्षाचा रास्ता रोको - nashik city news

महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ युवा स्वाभिमान महिला पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचा सरकारच्या निषेध करण्यासाठी सोमवारी (दि. 8 मार्च) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत द्वारका चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

agitator
आंदोलनकर्ते

By

Published : Mar 8, 2021, 4:42 PM IST

Updated : Mar 8, 2021, 5:07 PM IST

नाशिक- महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ युवा स्वाभिमान महिला पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचा सरकारच्या निषेध करण्यासाठी सोमवारी (दि. 8 मार्च) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत द्वारका चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी या महिलांना समज देऊन सोडून दिले आहे.

माहिती देताना महिला शहराध्यक्ष

महिलांवर अत्याचार रोखण्यात राज्यातील सरकार अपयशी

सोमवारी जागतिक महिला दिन असल्याने या दिनाचे औचित्य साधत युवा स्वाभिमानी पक्षाचे महिला शहराध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली नाशिक-पुणे रस्त्यावरील द्वारका चौकात राज्यात महिलांवर अत्याचार रोखण्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार अपयशी झाल्याच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.

महिलांवरील अत्याचारत मोठ्या प्रमाणात वाढ

आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये म्हटले आहे की, राज्यात दिवसेंदिवस महिलांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहे. पण, या अत्याचारांमध्ये कमी होण्याऐवजी त्यात वाढ होत आहे. ही वाढ थांबवण्यात राज्य सरकार अपयशी झाल्यामुळे या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी देखील महिला आघाडीने केली आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महिला संरक्षण विशेष कायदा तयार करून हे अत्याचार थांबवण्यात यावे, असे स्वाभिमानी पक्षाचे महिला शहराध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यानी सांगितले आहे.

हेही वाचा -नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात सीसीटीव्ही कैद, अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

हेही वाचा -नाशिक : 94 वे साहित्य संमेलन रद्द नाही तर स्थगित, कोरोनाची परिस्थिती पाहून नव्या तारखा जाहीर करणार

Last Updated : Mar 8, 2021, 5:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details