नाशिक - पूर्ववैमनस्यातून चौघांनी मिळून युवकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. संभाजी चौक परिसरात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. विवेक सुरेश शिंदे (वय२३), असे मृत युवकाचे नाव आहे.
नाशकात पूर्ववैमनस्यातून चौघांनी केली युवकाची हत्या - संभाजी चौक परिसरात युवकाची हत्या
शंभु जाधव, शिवा जाधव, सुशांत वाबळे आणि नाम्या अशी चार संशयित मारेकऱ्यांची नावे आहेत. मृत विवेक आणि शंभु यांच्यात 6 ते 7 महिन्यांपूर्वी वाद झाले होते. त्याचाच राग मनात ठेवत या चौघांनी शनिवारी रात्री बाराच्या सुमारास विवेकला रस्त्यात अडवून मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली.
हेही वाचा - प्रियकराच्या मदतीने वडिलांचा खून, सुटकेसमध्ये आढळले होते अवयव
शंभु जाधव, शिवा जाधव, सुशांत वाबळे आणि नाम्या अशी चार संशयित मारेकऱ्यांची नावे आहेत. मृत विवेक आणि शंभु यांच्यात 6 ते 7 महिन्यांपूर्वी वाद झाले होते. त्याचाच राग मनात ठेवत या चौघांनी शनिवारी रात्री बाराच्या सुमारास विवेकला रस्त्यात अडवून मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.