नाशिक -शहरातील सटाने येथील तलावात अंघोळ करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. यानंतर शोध घेऊन देखील मृतदेह सापडत नसल्याने मालेगाव येथील पथक पचारण करून मृतदेह शोधण्यात आला. कचरू देवराम माकुणे, असे मृताचे नाव आहे.
मनमाड : तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू - मनमाड सटाने तलाव
मनमाड शहरातील सटाने तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला आहे. कचरू देवराम माकुणे, असे मृताचे नाव आहे. रविवारी बकऱ्या चारत असताना अंघोळ करण्यासाठी तलावात गेला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

मनमाड नजिक असलेल्या सटाने या गावातील कचरू देवराम माकुणे हा काल बकऱ्या चारत असताना अंघोळ करण्यासाठी तलावात गेला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. सायंकाळपर्यंत ग्रामस्थांनी व पोलिसांनी शोध मोहीम केली. मात्र, तो सापडला नाही. यानंतर आज सकाळी मालेगाव येथील महापालिकेचे कर्मचारी शकील मोहम्मद (शकील तैराक) यांनी शोध मोहीम सुरू केली. त्यात त्यांना यश आले. पोलिसांनी पंचनामा करून, मृतदेहाचे मनमाड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.