महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Manas Pagar Passes Away: मानस पगार यांचे अपघाती निधन; पदवीधर निकालाआधीच सत्यजित तांबेंनी पाठीराखा गमावला - पदवीधर निकालाआधीच सत्यजित तांबेनी पाठीराखा गमावला

नाशिकच्या पंचवटी डेपोसमोरील उड्डाण पुलावर बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात नाशिक ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार (32) यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे एक उमदे युवा नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मानस पगार हे सत्यजीत तांबे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. तसेच युवक काँग्रेसमधील चर्चेतील चेहरा म्हणून त्यांची ओळख होती.

Manas Pagar Passes Away
मानस पगार यांचा मृत्यू

By

Published : Feb 2, 2023, 1:20 PM IST

नाशिक:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी डेपोसमोरील उड्डाण पुलावर बुधवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मानस पगार हे सहकाऱ्यासमवेत पिंपळगावकडे परतत होते. मागून आलेल्या वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या मानस पगार यांचे निधन झाले. तर सहकारी सूरज मोरे हा गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर सत्यजित तांबे यांनी स्वत: ट्विट करत आपल्या सहका-यास श्रद्धांजली व्यक्त केली आहे. माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे, असे ट्विट करत सत्यजित तांबे यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

सोशल मिडियावर श्रद्धांजली


सोशल मिडियावर श्रद्धांजली:मानस पगार हे सोशल मीडियावर काँग्रेसची भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडत होते. त्यामुळे पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. मानस पगार यांच्या अकाली मृत्यूचे वृत्त समजताच राज्य व देशपातळीवरील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोशल मिडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. अनेकांना या वृत्ताने धक्का बसला आहे.



या उपोषणामुळे आले होते चर्चेत:भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेर मानस पगार यांनी दीर्घकाळ केलेल्या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती. दानवेंनी शेतकऱ्यांसाठी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेमुळे त्यांच्या घरासमोर उपोषण करण्यात आले होते. त्यात मानस पगार आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या सुटकेसाठी युवक काँग्रेसने सोशल मीडियावर मोहीम सुरू केली होती. दरम्यान, काँग्रेसने २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी राबवलेल्या सुपर सिक्स्टी अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून २०२० मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युवा जोडो अभियान राबवण्यात आले. या अभियानासाठी मानस पगार यांच्याकडे मुख्य समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली होती.


रोहित पवारांनीही शेअर केली फेसबुक पोस्ट: माझा मित्र आणि युवक काँग्रेसचा पदाधिकारी मानस पगार याचं अपघाती निधन झाल्याची मन सुन्न करणारी बातमी समजली. या दुःखद प्रसंगी मी त्याच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पोस्ट फेसबुकवर शेअर केली.



हेही वाचा: Nashik Graduate Constituency Election नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी मतदान सुरू सत्यजीत तांबेशुभांगी पाटील यांच्यात लढत

ABOUT THE AUTHOR

...view details