महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यातील देवपूरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या - गळफास

अज्ञात कारणाने देवपूर (ता.दिंडोरी) येथील एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र

By

Published : Feb 6, 2020, 7:35 AM IST

नाशिक- दिंडोरी तालुक्यातील देवपूर येथे एका तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. पुरोषोत्तम शांताराम महाले (२२) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येच्या या घटनेने गावातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वणी (ता. दिंडोरी) येथील पोलिसांडून मिळालेल्या माहीती नुसार, देवपूर येथील पुरुषोत्तम शांताराम महाले (वय 22 वर्षे) याने दुपारी पाउणे चार वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी कोणीही नसताना दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाडवी यांच्या मार्गदर्शनाने पोलीस हवलदार ए. एम. जाधव करत आहेत.

हेही वाचा - वेळेत तमाशा बंद केला म्हणून कलावंतांवर प्राणघातक हल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details