नाशिक - कॅन्सरग्रस्त महिलांना केस गेल्यामुळे नैराश्येला बळी पडावे लागते. केशविहीन समाजात कसे वावरायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावत असतो. अशा महिलांना पाठबळ देण्यासाठी नाशिकच्या सुचिता आकुल आणि मृणाल बाविस्कर यांनी केरळ येथील एका सामाजिक संस्थेस केसदान करून एक आदर्श घालून दिला आहे.
जपली सामाजिक बांधिलकी
स्रियांच्या डोक्यावरील केस त्यांच्यासाठी आभूषण असतात. केसांमुळे महिलांच्या सौंदर्यात अधिक भर पडत असते, म्हणून सर्वच स्त्रीया केसांची विशेष काळजी घेत असतात. मात्र, कॅन्सरचा सामना करताना उपचारादरम्यान अनेक महिलांना डोक्यावरील केस गमवावे लागतात. अशा वेळी अनेक महिलांना नैराश्येला बळी पडावे लागते. केशविहीन समाजात कसे वावरायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावतो असतो. अशा महिलांना पाठबळ देण्यासाठी नाशिकच्या सुचिता आकुल आणि मृणाल बाविस्कर यांनी केरळ येथील एका सामजिक संस्थेस केसदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
हेही वाचा -नाशिक - सिडकोत अज्ञात समाजकंटकानी सात कारच्या काचा फोडल्या
कॅन्सरग्रस्त महिलांना किमोथेरेपी नतंर केस गमवावे लागतात, डोक्याला टक्कल पडल्याने अनेक महिलांना नैराश्य येते. समाजात वावरतांना लोक काय म्हणतील, असा प्रश्न त्यांना भेडसावत असतो. यावर उपाय म्हणून अशा महिला विगचा वापर करतात. अशा सर्व परिस्थितीचा विचार करून शहरातील देवळाली कॅम्प येथील एका बँकेत लिपिक म्हणून काम करणार्या सुचिता आकुल व मुकबधीर असलेल्या मृणाल बाविस्कर यांनी आपल्या डोक्यावरील केस दान केले. केरळमधील सरगक्षेत्र कल्चरल अँड चॅरिटेबल ट्रस्टला हे केस दान करण्यात आले. कॅन्सरग्रस्त महिलांचे मनोबल वाढविण्यासाठी, तसेच महिलांमध्ये केसदान ही संकल्पना रुजविण्यासाठी या महिलांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.