महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक : देवळालीत मध्यरात्री युवकाची हत्या... घटना सीसीटीव्हीत कैद - नाशिक क्राइम

ऐन सणाच्या दिवशी देवळाली गावात योगेश चायल या तरुणाची भररस्त्यात हत्या करण्यात आली. हा तरुण रस्त्यावर उभा असताना एका रिक्षातून आलेल्या 5 ते 6 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर कोयत्यासह अन्य धारदार शस्त्रांनी वार केले.

crime in nashik
नाशिक : देवळालीत मध्यरात्री युवकाची हत्या... घटना सीसीटीव्हीत कैद

By

Published : Nov 16, 2020, 5:59 PM IST

नाशिक - ऐन सणाच्या दिवशी देवळाली गावात योगेश चायल या तरुणाची भररस्त्यात हत्या करण्यात आली. हा तरुण रस्त्यावर उभा असताना एका रिक्षातून आलेल्या 5 ते 6 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर कोयत्यासह अन्य धारदार शस्त्रांनी वार केले. यानंतर आरोपी फरार झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून परिसरात खळबळ माजली आहे. हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.

नाशिक : देवळालीत मध्यरात्री युवकाची हत्या... घटना सीसीटीव्हीत कैद

योगेशच्या मानेवर गंभीर जखम झाल्याने त्याला उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. संबंधित प्रकार जवळच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक कुंदन जाधव अधिक तपास करत आहेत.

ऐन सणाच्या दिवशी देवळाली गावात योगेश चायल या तरुणाची भररस्त्यात हत्या करण्यात आली

मागील काही दिवसांपासून या परिसरात कोयता गँग उदयास आली आहे. या भागात अनेक हल्ले, प्रतिहल्ल्यांच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी गस्त व कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवण्याची मागणी नागरिक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details