महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विंग कमांडर अभिनंदन यांच्याबद्दल फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट, नागरिकांनी केला रास्ता रोको - POST

पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रास्ता रोको

By

Published : Mar 5, 2019, 12:00 PM IST

नाशिक- पाकिस्तानमधून आलेल्या वायुदलातील विंग कमांडर अभिनंदन यांच्या अभिनंदनासाठी येवला तालुक्यातील अंदरसुल येथील युवकाने एक पोस्ट टाकली होती. सदर पोस्टवर एका समाजकंटकाने आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने अंदरसूल येथील नागरिकांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे त्यांनी चौफुली येथे अचानक रास्ता रोको केला.

या रास्ता रोकोमुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची परस्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी धाव घेतली. मनमाड विभागाच्या पोलीस उपाधीक्षक रागसुधा यांनी अंदरसुल येथे भेट दिली. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतल्याने परिस्थिती लवकर नियंत्रणात आली.

अंदरसुल येथील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी सदर आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तर तालुका पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details